7 गोष्टी ज्या देतील तुमचा मेंदूला चालना

Admin

मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीचे 7 उपाय,जे तुमचे मानसिक स्वास्थ्य सुधारतील.

मेंदूचे व्यायाम|मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी उपाय|मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी व्यायाम|how to make brain sharp|brain exercise

 मेंदू म्हणजेच एक असा अवयव की त्याचा माणूस अगदी पुरेपूर वापर करून घेतो. पण याच मेंदूला देखील आरामाची, देखभालीची गरज असते हे काही माणसांना कळतच नाही.आपला मेंदू मणक्याशी जोडलेला असतो आणि त्याच्या कार्यामुळे शरीराच्या सर्व क्रियांची ताळमेळ साधला जात असतो. पण याच मेंदूचे कार्य जर नीट नाही चालले तर मग आपली विचार करण्याची, भावना मांडण्याची आणि मुख्य म्हणजे शारीरिक क्रिया करण्याची क्षमता बिघडते.म्हणुनच मेंदूच्या योग्य कार्यासाठी पोषण खूप महत्त्वाचे आहे. योग्य आहार, व्यायाम, आणि पुरेशी झोप यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहते. मेंदूची वाढ आणि विकास लहानपणापासून सुरु होतो आणि त्याचा उत्तम उपयोग केल्यास जीवन अधिक यशस्वी होते. तसेच मेंदूला अधिक सक्रिय करण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण आता पाहणार आहोत.

मेंदूच्या व्यायामाची गरज:-


मेंदूच्या व्यायामाने आपल्याला मानसिक आराम मिळतो आणि थकवा कमी होतो. स्मरणशक्तीला चालना मिळते तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते.दररोज मेंदूचे व्यायाम केल्याने आपल्याला त्याचे व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये चांगले परिणाम दिसून येतात.



how to make brain active|how to make brain sharp and intelligent|मेंदूला चालना मिळण्यासाठी उपाय|मेंदूला चालना मिळण्यासाठी व्यायाम


तुम्ही व्यायामामध्ये काय काय करू शकता तर,


१) व्यायाम:-


दररोज सकाळी काही वेळ हा व्यायामाला द्या. मग तो मैदानावरच किंवा जिम मध्ये जाऊन केला पाहिजे असं नाही, वेळ कमी असल्यास योग देखिल करू शकता त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि आपले शरीर मेंदूला चांगला प्रतिसाद देते.


२) खेळ:-


आता तुम्ही म्हणाल खेळामधून मेंदूचा व्यायाम कसा होईल, तर त्याच उत्तर होय अस आहे खेळामधून सुद्धा मेंदूचा व्यायाम होऊ शकतो. यासाठी तुम्हाला मैदानी खेळ खेळण्याची आवश्यकता नाही तुम्ही घरबसल्या देखील ते करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही बुद्धिबळ खेळू शकता, तसेच कमी वेळ असल्यास पेपरमधील शब्द कोडी सोडवणे, मोबाईल वरील पझल्सचे खेळ,एक ते शंभर उलटे आकडे मोजणे. असे अनेक खेळ तुम्ही मोकळ्या वेळेत खेळू शकता त्यामुळे तुमच्या स्मरणशक्तीला चालना मिळते आणि कोणतीही समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.


३) छंद:-


तुमच्या छंदाची यामध्ये खूप मदत होईल. जर तुम्हाला गाणे गाण्याचा, कोणतेही वाद्य वाजवण्याचा, पुस्तक वाचण्याचा, भटकंती करण्याचा असा कोणताही छंद असेल तर त्या छंदामुळे तुमचे लक्ष एखाद्या गंभीर विषयावरून त्या छंदाकडे वळते आणि मानसिक शांतता मिळते आणि मेंदूला आराम मिळतो.


४) आहार:-


आपला आहार हा देखील मेंदूचे स्वास्थ्य टिकवून ठेवणारा एक मुख्य घटक आहे. आपले शरीरच निरोगी नसेल तर त्या शरीराला चालवणारा मेंदू देखील थकतो. या उलट शरीर निरोगी असेल तर ते नीट चालवण्यासाठी मेंदूलाही कमी कष्ट घ्यावे लागतात आणि मेंदूला आराम मिळतो.


५) ध्यानस्थ बसणे:-


ध्यान केल्याने तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्तीला चालना मिळते. तुम्ही यासाठी एक शांत जागा निवडायची आहे,आरामात बसून डोळे बंद करायचे आहेत आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे.दिवसभरामध्ये किमान १०-१५ मिनिटे केल्याने याचा नक्की फायदा होतो.


६) सारांश लिहिणे:-


यामध्ये तुम्हाला दिवसाच्या शेवटी झोपण्यापूर्वी आपण दिवसभरामध्ये ठरवलेल्या गोष्टींपैकी काय-काय आणि किती पूर्ण झाले याचा सारांश लिहायचा आहे. यामुळे एखादी गोष्ट ठरवल्याप्रमाणे पूर्ण झाल्याचे मानसिक समाधान मिळते आणि पुढील दिवसाच्या कामासाठी ऊर्जा मिळते.


७) झोप:-


 झोप हा मेंदूसाठी सर्वात उत्तम व्यायाम आहे. आपली किमान ७ ते ८ तास झोप होईल याची काळजी घेतली पाहिजे.

तसेच झोप ही योग्य वेळी होणेही गरजेचे आहे.अकाळी झोपेने मेंदूचे कार्य विचलित होते आणि आपले स्वास्थ्य ही बिघडते.



how to make strong|how to make brain faster| मेंदूची काळजी कशी घ्यावी

Post a Comment