लाडकी बहीण योजना|ladaki bahin yojana

Admin

ladki bahin yojana 2025|लाडकी बहीण योजना 2025

योजनेचे अर्ज बाद होणार? नवीन निकषानुसार छाननी सुरू.


निवडणुकीमध्ये गाजलेली योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. त्यायोजनेद्वारे महिलांच्या खात्यात 1500 रुपये थेट जमा करण्यात आले. त्यावेळी ज्या महिलांनी अर्ज केला त्यापैकी अनेक महिलांना पैसे मिळाले. परंतु आता मात्र विविध निकष लावले जाणार आहेत.

नवीन सरकारने लाभाची रक्कम 1500 रुपये वरुन 2100 रुपये केली परंतु नवीन हफ्ता जमा होत असताना लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपयेच जमा होत आहेत. सुधारित 2100 रुपये अद्याप जमा नाहीत.आता हळूहळू अर्जांची छाननी होत असताना फसवणूकचा तसेच बोगस अर्जांचा प्रकार समोर येत आहे. ते अर्ज बाद करत त्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली गेली आहे.


लाडकी बहीण योजना फॉर्म online apply|लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म|लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 2025|लाडकी बहीण योजना फॉर्म|लाडकी बहीण योजना यादी|लाडकी बहीण योजना फॉर्म pdf|लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार


योजनेसाठी एकूण 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ मिळाला होता. तसेच त्यावेळी आधार सिडींग झालेलं नसल्यानं लाभ नमिळालेल्या ज्या महिलांचं आता आधार सिडिंग झालंय अशा 12 लाख 67 हजार महिलांना पहिल्या महिन्यापासूनचे पैसे एकाचवेळी देण्यात आले. तसेच 5 महिन्यांचा लाभ घेतलेल्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हफ्ता देण्यात आला.

 डिसेंबरचा हफ्ताही महिलांना वितरित करण्यात आला. मात्र, आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी होणार असून सरकारनं काही निकष निश्चित केले आहेत. विविध जिल्ह्यांत आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला गेला असुन त्यानुसार तक्रारींच निराकरण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अर्जांची छाननी होणार आहे.




निकष खालीलप्रमाणे:


1)लाभार्थी महिला दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल म्हणजे उदाहरणार्थ,एखादी महिला 'नमो शेतकरी' योजनेचा लाभ घेत असेल, तर तिला या योजनेतून मिळणाऱ्या 1000 रुपयांमध्ये वाढीव 500 रुपये देऊन 1500 रुपयांपर्यंतचा हफ्ता करण्यात येईल. 


2) अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारनं आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार अर्जांची छाननी होईल. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला लाभ मिळणार नाही.


3) आधार ई केवायसी केली जाणार आहे.

आधार कार्ड वरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव वेगळं अशा अर्जांची सुद्धा छाननी होणार आहे.


4)शासकीय नोकरीत असताना लाभ घेत असणाऱ्या तसेच राज्यातील रहिवासी नसणाऱ्या अशा अर्जांची सुद्धा छाननी होईल व संबंधित अर्जांचा लाभ देखील बंद होणार आहे.

  

5) चारचाकी वाहनं असणाऱ्या महिलांच्या अर्जांची देखील छाननी होणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे.संबंधित अर्ज बाद करण्यात येणार आहे.


ladki bahin yojana online apply महाराष्ट्र link|ladki bahin yojana यादी maharashtra|ladki bahin yojana यादी maharashtra pdf|ladki bahin yojana list महाराष्ट्र pdf|ladki bahin yojana list महाराष्ट्र|ladki bahin yojana latest news


गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दीड दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्हास्तरीय कार्यालय, आयुक्त कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.


1)नाव आणि आधार नंबर वेगवेगळा आहे, 

2)काहींनी दोनवेळा अर्ज केलेला आहे,

3)काही महिला लग्नापूर्वी महाराष्ट्रात वास्तव्यास होत्या, त्या आता दुसऱ्या राज्याच्या रहिवासी आहे,

4)हमीपत्र चुकीचे जोडलेलं आहे 

अशा तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आल्या आहेत.


शासन निर्णयात कुठलाही बदल केलेला नाही.परंतु  तक्रार निवारण्यासाठी शासन 5 निकषांच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करणार आहे.


तसेच लाडकी बहिण योजनेबाबत व इतर विविध योजना संबंधित अद्ययावत माहिती करता www.alertmarathi.com   या‌ संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.


अधिकृत वेबसाईट (official website) : क्लिक करा 


लाभार्थी यादी :क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Online Form): क्लिक करा.

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠


Post a Comment